आरोग्य कर्मचारी मकसूद शेख यांचा राज्यपाल व आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : करंजविहिरे ( ता. खेड ) येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी श्री. मकसूद शेख यांचा आज ( दि. १५ ऑक्टोबर ) रोजी राजभवन मुंबई येथे राज्यपाल श्री. भगतसिंग कोशारी व आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांच्या हस्ते ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी चाकण एमआयडीसी व परिसरातील गावांमध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रा. पं. कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना सोबत घेऊन कोविड रुग्णांसाठी प्रशंसनीय काम केले आहे. गावागावात सर्व्हेक्षण, प्रतिबंधित क्षेत्र, स्वब टेस्टिंग, म्हाडा मधील कोविड सेंटर मध्ये रुग्णांना सुविधा आदी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आज प्रशासनाने त्यांचा गौरव केला आहे.