आपल्याच गावात, शेतात, बांधावर काम करा आणि रोजगार मिळवा, त्यासाठी तुम्हाला शासन पैसे देणार…शासनाचा अभिनव उपक्रम… जाणून घ्या या उपक्रमाची माहिती…
शासनाचा अभिनव उपक्रम… आपल्याच गावात, शेतात, बांधावर काम करा आणि रोजगार मिळवा, त्यासाठी तुम्हाला शासन पैसे देणार…जाणून घ्या या उपक्रमाची माहिती…
● पर्याय प्रतिष्ठानच्या वतीने “रोजगार हमी योजनेच्या”
जाणीव जागृतिचा अभिनव उपक्रम
महाबुलेटीन न्यूज । विशेष प्रतिनिधी
जनावरांसाठी गोठा बांधा, पैसे शासन देईल.
गावात पाणलोटची कामे करा, शोष खड्डे करा, शौचालय बांधा, सरकार पैसे देईल…
कशी वाटतात ही वाक्य? पटत नाही ना? पण हे शक्य आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून..
आणि यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.. सर्व प्रक्रिया आपल्या ग्रामपंचायत स्तरावरच होणार.. फक्त गरज आहे योजना समजून घेण्याची.. आणि हो, यावर्षी कोरोनामुळे शासन इतर योजनावरील बजेट कमी करत आहे, तर या योजनेवरील बजेट मात्र मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे, त्याचे कारण आहे – ‘गाव तिथे रोजगार..’
या योजनेतंर्गत सिंचन व जलसंधारण कामे प्राधान्याने करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. तसेच वैयक्तिक लाभाची कामे अंतर्गत विहीरी, फळबाग लागवड, गायी / शेळ्यांचा गोठा, शेततळे, रेशीम विकास कामे, शौचालये, शेतीची बांध बंधीस्ती व दुरूस्तीचे कामे केल्या जातात. योजनेतंर्गत सार्वजनिक लाभाची कामे वनीकरण, वृक्ष लागवड, गावनाला, गावरस्ते, शेत, पाणंद रस्ते, गाळ काढणे, जलसंधारण अथवा जलसंवर्धन यांचे माध्यमातून गावाच्या उपयोगी स्थायी मत्ता तयार करून गावाच्या विकासाची संकल्पना राबविली जाते. सदर योजना ही वैयक्तिक विकासासह गाव विकासाचे दृष्टीने अत्यंत महत्वाची असून मोठ्या प्रमाणात रोजगार क्षमता या योजनेत आहे.
● महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत
गावातील 5 एकर पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांच्यासाठी अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत लाभ मिळू शकतो. त्यात प्रामुख्याने पुढील योजनांचा समावेश होतो.
1) जनावरांसाठी गोठा
2) शेळीपालन शेड
3) कुक्कुटपालन शेड
4) सिंचन विहीर
5)शेततळे
6) शेताच्या बांधावर वृक्ष लागवड
7) गांडुळ खताचे टाके
8) नॅडेप खताचे टाके
9)फळबाग लागवड
10) सांडपाणीसाठी शोषखड्डा
इत्यादी सारखी अनेक कामे घेता येतात. विशेष म्हणजे या सर्व योजना वैयक्तिक लाभाच्या आहेत. त्यासाठी कोठेही गावाबाहेर जायची गरज नाही. शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात, परंतु पूर्णपणे माहितीचा अभाव असल्याकारणाने गरजू लोकांना त्याचा लाभ होत नाही.
तशीच ‘महात्मा गांधी रोजगार हमी योजना’ ही एक ग्रामविकास विभागातील अतिशय महत्वाची लाभदायक योजना आहे. याचा प्रत्यक्ष DBT (Direct Beneficiary Transfer) द्वारे सर्व लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर मिळतो. त्यामुळे इथे कोठेही तालुका, जिल्हास्तरावर जाण्याची शेतकऱ्यांना जाण्याची गरज नसते.
■ अधिक महितीसाठी संपर्क
श्री वामन सोपानराव बाजारे
15 वा वित्त आयोग तथा
आमचा गांव- आमचा विकास
प्रवीण प्रशिक्षक, यशदा, पुणे.
अध्यक्ष- पर्याय प्रतिष्ठान, राजगुरुनगर
Mob.9922421538.
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴