Saturday, August 30, 2025
Latest:
अहमदनगरनासिकपुणे जिल्हाविशेषशैक्षणिक

महत्वाची बातमी : अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार…

13 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन / ऑफलाईन फॉर्म भरण्याचे विद्यापीठाचे आवाहन…

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या परिसरातील व गावांतील कॉलेजमध्ये T.Y.B.A./B.com/B.Sc./M.A./M.com/M.sc/ Enjiniring च्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले असुन, येत्या 13 सप्टेंबरच्या आत सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईट वर फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परंतु एवढ्या कमी दिवसांत सर्वांपर्यंत मेसेज पोहचविणे एक मोठं आव्हान आहे. अनेक विद्यार्थ्यांना कल्पना सुद्धा नसेल कि, आपली परीक्षा काही दिवसांत होणार आहे. त्यासाठी आपण एक छोटीशी मदत केली, तर त्यांचं भविष्य घडू शकतं. तरी या माध्यमातून आपण आपल्या परिसरातील सर्व गावांतील विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज द्वारे माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या परिचित मित्रांना ते forward करून गावातील ग्रुप मध्ये पाठवा. जेणेकरून त्यांच्या करियरचे नुकसान होणार नाही. अतिदुर्गम भागापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!