अमोल माने यांना पीएचडी प्रदान
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : येथील एम. आय. टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळंदी येथील व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले अमोल माने यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वाणिज्य व व्यवथापनशास्त्र विद्याशाखेच्या वतीने डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
त्यांनी Business Management या विषयात संशोधन केले. त्यांच्या संशोधनाचा विषय “The Impact of Information Technology on the Performance of Banks in Pune City” असा होता. सदर संशोधन डॉ. राजशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. या यशाबद्दल त्यांचे महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच समाजातील विविध मान्यवरांनी त्यांचा गौरव केला.
—