आंबेगाव तालुक्यात बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुस्लिम बांधवांनी घरीच केले नमाज पठण, सोशल मिडियाद्वारे शुभेच्छा
महाबुलेटीन न्यूज / अविनाश घोलप
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे कोरोना माहामारीचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता घरीच नमाज पठण करुन अतिशय साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यात आली. फोन, मेसेज, सोशल मीडियाद्वारे बकरी ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
वर्षाच्या १२ व्या महिना जुलहद या महिन्याचा चंद्र दिसल्यानंतर होणारा सणास बकरी ईद असे म्हटले जाते. या ईदीला धर्मामध्ये रमजान ईदीप्रमाणे स्थान आहे. याच महिन्यामध्ये हज होते. तसेच या ईदच्या दिवशी हजरत इब्राहिम अले अस्सलाम यांनी दिलेल्या कुरबानीची परंपरा ही आज कायम परंतु कोरोना माहामारीचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता साध्या पध्दतीने दर्गा, मस्जीद बंद ठेवून घरीच नमाज पठण करून घोडेगाव येथे बकरी ईद साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने ही माहामारी नष्ट व्हावी यासाठी हिंदू – मुस्लीम अशा सर्व धर्मियांसाठी प्रार्थना करण्यात आली. या ठिकाणी शांतता सुव्यवस्था राखुन घोडेगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस बांधवांना सहकार्य करण्यात आली असल्याची माहिती महाबुलेटिनशी बोलताना हाजी उस्मानभाई महंमद काठेवाडी यांनी दिली.
घोडेगाव येथे मुस्लिम बांधवांनी घरच्या घरी नमाज पठण केले. ( छायाचित्र : अविनाश घोलप )