Sunday, January 25, 2026
Latest:
गुन्हेगारीजुन्नरपुणे जिल्हाविशेष

आळेफाटा पोलिसांची अवैध दारू धंद्यांवर जोरदार कारवाई, १ लाख ४४ हजार रुपयांची अवैध दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

 

महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव (किरण वाजगे) : आळेफाटा पोलिसांनी दबंग कारवाई करत पिंपळवंडी (ता. जुन्नर) गावच्या बस स्टॅन्ड परिसरामध्ये दोन ठिकाणी अवैध दारू साठ्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये एका ठिकाणाहून ९२ हजार रुपयांचा तर दुसऱ्या ठिकाणाहून ५२ हजार रुपयांचा असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या साठ्यामध्ये ऑफिसर चॉईस, रॉयल स्टॅग, मॅकडॉल नंबर 1, इम्पेरियल ब्ल्यू, जी. एम., डॉक्टर ब्रांडी, डी. एस. पी. ब्लॅक, रॉयल चॅलेंज असे देशी-विदेशी दारू चे एकूण ४२ बॉक्स तसेच २५ हजार रुपयांचे साहित्य असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याप्रमाणे एकूण ३ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर यांनी दिली.

  ही कामगिरी आळेफाटा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, सहायक फौजदार सतीश घाडगे, पो.ना. नारायण बर्डे, पो.नाईक. नरेंद्र गोराणे, पो. शिपाई गोविंद केंद्रे, किशोर कोरडे, निलेश करे, दीपक गर्जे, मोहन आनंदगावकर, मुरूमकर,  वैद्य, सचिन डामसे, किशोर कुलकर्णी, महिला पो. शिपाई ज्योती दहिफळे, वैद्य, तडवी, मुरूमकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!