अध्यात्मिककोरोनाखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेषसण-उत्सव

अलंकापुरीतील माऊली मंदिर भाविकांचे दर्शनास रहाणार बंद… मकर संक्रांतीचे पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी निर्णय

अलंकापुरीतील माऊली मंदिर भाविकांचे दर्शनास रहाणार बंद
मकर संक्रांतीचे पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी निर्णय

महाबुलेटीन न्यूज

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यातील वाढते कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण आणि मंदिरांत मकर संक्रांती निमित्त महिला भाविकांची देवदर्शनास होणारी गर्दी टाळण्यासह कोरोनाचा प्रसार रोखण्याचे उपाय योजनेचा भाग म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनसमाधी मंदिर भाविकांना १३ जानेवारी रात्री पासून ते १५ जानेवारी २०२२ सकाळी वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान मंदिरातीलधार्मिक परंपरेचे कार्यक्रम मर्यादित स्वरुपात सुरू रहाणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.

   आळंदी मंदिरात शुक्रवारी ( दि. १४ ) मकरसंक्रांत अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्याच लोकांत साजरी होणार आहे. मकर संक्रांत दिनीआळंदीत महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. वाढत्या कोरोनाचे रुग्ण संख्येमुळे मंदिर प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठीभाविकांना मंदिर दर्शनास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात ओवसा वाहण्यासाठीराज्यातून हजारो महिला आळंदीला येत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, इंद्रायणी नदी घाट, आळंदीतीलविविध मंदिरांत गर्दी करून देवदर्शन घेत ओवसा वाहत असतात. यावर्षी ही कोरोनाचे संकट कायम असल्याने आता मंदिर भाविकांनादर्शनास बंद रहाणार आहे. याची भाविक, नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले आहे.

   मकर संक्रांत दिनी आळंदी शहरात प्रचंड गर्दी होत असते, यामुळे कोविड १९ विषाणू आणि ओमायक्रोन व्हेरियंटचा संसर्ग प्रादुर्भाववाढू नये याची दक्षता घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे शासना बरोबरच नागरिकांचे, विविध संस्थांचे कर्तव्य असून यानिर्णयास सहकारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीचे दिवशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरबंद ठेवण्याचा  निर्णय आळंदी देवस्थानने घेतला आहे. दर्शनार्थी भाविक, वारकरी, ग्रामस्थ तसेच व्यापक सामाजिक आरोग्याचा विचारकरून देवस्थानने गर्दी कमी करण्यासाठी आवाहन केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यातयेणार आहे. या काळात श्रींचे नित्याचे उपचार आणि परंपरेने होणारे धार्मिक कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होणार आहे. दरम्यानभाविकांनी युट्युब आणि आळंदी देवस्थानच्या फेसबुक पेजवर थेट श्रींचे दर्शन मिळणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनीसांगितले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!