अलंकापुरीत पत्रकार दिनी सामाजिक उपक्रम, पत्रकारांचा सत्कार
महाबुलेटीन न्यूज
आळंदी : येथील आळंदी जनकल्याण फाउंडेशन च्या वतीने ६ जानेवारी पत्रकार दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ६ जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला. यानिमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन,पुष्पांजली अर्पण करून अभिवादन तसेच वारकरी साधकांना अन्नदान तसेच सुरक्षा साधने मास्क वाटप आणि पत्रकारांचा सत्कार करीत सामाजिक बांधीलकीतून पत्रकार दिन साजरा केला.
पत्रकार दिना निमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेस ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, गजानन महाराज लाहुडकर,पत्रकार विलास काटे आदींचे हस्ते पुष्पांजली अर्पण करीत प्रतिमा पूजन करण्यात आले. आळंदीतील पत्रकार विलास काटे, अर्जुन मेदनकर, भानूदास प-हाड, श्रीकांत बोरावके, हमीद शेख, सुनिल बटवाल, अनिल जोगदंड, महादेव पाखरे, दिनेश कु-हाडे, शाहीर हेमंत मावळे या पत्रकारांचा पत्रकार दिना निमित्त वाचन संस्कृती वाढीसाठी पुस्तके भेट देवून पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
आळंदीत निवासी राहून वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेत असलेल्या वारकरी साधकांना सुरक्षा साधने मास्क वाटप व आळंदी जनकल्याण फाउंडेशन संचलित श्री मुक्ताई माऊली अन्नछत्र आळंदी अंतर्गत मधुकरी अन्नदान वाटप पत्रकार दिनी झाले. आचार्य दर्पणकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मृतीस विनम्र अभिवादन करीत गजानन महाराज लाहुडकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सागर महाराज लाहुडकर यांनी मार्गदर्शन केले. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक,श्री संजय घुंडरे(पाटील) दिनेश सोळंकर यांचे उपस्थितीत शाहीर हेमंतराजे मावळे यांनी समारोपात शाहीरी गायली.
कार्यक्रमासाठी आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, सचिव पत्रकार अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर घुंडरे, दिनकर तांबे, अनिल कारेकर, सागर महाराज लाहुडकर आदींनी परिश्रम घेतले.