Saturday, August 30, 2025
Latest:
अभिष्ठचिंतनआरोग्यखेडपुणे जिल्हाविधायकविशेषसामाजिक

आळंदीत वाढदिवसाला फाटा देऊन राबविले सामाजिक उपक्रम… ११६ रक्तदात्यांचे रक्तदान, अन्नदान, आरोग्यसेवेसह सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न …

महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आळंदी शहराध्यक्ष अजयभाऊ तापकीर यांच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवून राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून रक्तदान शिबिर, फळे वाटप, वारकरी साधक विद्यार्थी यांना अन्नदान असे विविध सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. 

आळंदी राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे मनसेचे आळंदी शहराध्यक्ष अजय आळंदीत आयोजित रक्तदान शिबिरात ११६ रक्तदात्यांनी रक्तदान करून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहनास प्रतिसाद दिला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष समीरभाऊ थिगळे, उपजिल्हाध्यक्ष मनोज खराबी, मनविसे उपजिल्हाध्यक्ष मंगेश सावंत, तालुकाध्यक्ष संदीप पवार, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, दिनेश घुले, नगरसेवक सचिन गिलबिले, अनिकेत तापकीर , खुशाल तापकीर आदि उपस्थित होते.

दिघी येथील मातृछाया आनंदाश्रमात फळ वाटप व गोपाळपुरा येथे साधक वारकरी यांना अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांचे हस्ते शहराध्यक्ष अजय तपकिर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे सचिव अर्जुन मेदनकर, दिनकर तांबे, नवनाथ महाराज शिंदे, विठ्ठल महाराज कांबळे आदींसह वारकरी साधक उपस्थित होते.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!