आळंदीतील कु. गौरी देवरे यांची सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर नियुक्ती
महाबुलेटीन न्यूज | प्रतिनिधी
आळंदी : आळंदी ( ता. खेड ) येथील कु. गौरी मनिषा शंकरराव देवरे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत असिस्टंट बीडीओ म्हणजेच सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावर नियुक्ती झाली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी येथील जिल्हा आदर्श पुरस्कार विजेत्या शिक्षिका मनिषा भिकाजी धुमाळ – देवरे आणि सदगुरु भास्करगिरी संस्कृत विद्यालयाचे संस्थापक शंकरराव देवरे यांची गौरी कन्या आहे. बालपणापासूनच धार्मिक आणि सुसंस्कृत वातावरणात वाढलेली गौरी हिने अतिशय जिद्दीने हे यश मिळविले.
गौरी यांचे मुळगाव प्रवरासंगम (देवगड) जि. अहमदनगर तर आजोळ पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे असून सध्या श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे स्थायिक आहे. धार्मिक क्षेत्रातून समाज जीवनाची आवड जोपासणाऱ्या या परिवारातील ही कन्या भविष्यामध्ये भारतीय लोकसेवा आयोगामार्फत यूपीएससी मध्ये यश मिळवून देश पातळीवर देशाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. गौरीचे आई-वडील, गुरुजन तसेच तिला तिच्या यशामध्ये सहाय्यक ठरणारे मार्गदर्शकांचे ती मनःपूर्वक ऋण व्यक्त करत आहे.