आळंदीत आरोग्य सर्व्हेक्षणात ६ हजार ६५० कुटुंबांची तपासणी ; नागरिकांचा प्रतिसाद
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : येथील आळंदी नगरपरिषदेने शासनाच्या धोरणा प्रमाणे माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत आळंदी नगरपरिषदेच्या ९ प्रभागात एकाच वेळी सुमारे ६ हजार ६५० कुटुंबांना घर भेटीतून आरोग्य तपासणी केली. यात २०२ लोकांची रॅपिड अंन्टीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये २९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. या २९ रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
या मोहिमेत सुमारे ४५ प्रशिक्षित आरोग्य सेवकांची पथके तयार करून सुमारे ११२ प्रशिक्षित शिक्षक, कर्मचारी व आरोग्य वैद्यकीय सेवक कर्मचारी यांचे विशेष सहकार्य झाले. घर भेटीच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिमेत पदाधिकारी व नागरिकांनी उत्साही प्रतिसाद दिल्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या धोरणा प्रमाणे सुरू करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत प्रभावी पणे जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेत घरोघरी जाऊन सर्व नागरिकांचे ऑक्सिमीटर व ताप तपासणी यंत्राचे मदतीने नागरिकांची ऑक्सिजन व ताप या बाबत तपासणी करण्यात आली. यासाठी सर्व सेवकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली होती. खेडच्या तहसिलदार सुचित्रा आमले यांनी यावेळी प्रत्येक्ष कामाची पाहणी करून सेवकांना मार्गदर्शन केले. घर भेटीचे परिसरात जाऊन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचेसह स्थानिक नगरसेवक सागर बोरुंदीया, प्रकाश कुऱ्हाडे, सागर भोसले, सुनीता रंधवे, स्नेहल कुऱ्हाडे, गटनेते पांडुरंग वहिले, सचिन गिलबिले, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी आपापल्या भागात नागरिकांचे आरोग्य तपासणीत सहभागी होत नागरिकांमध्ये उत्साह वाढविला. नागरिकांना आरोग्य तपासणी करण्यास आवाहन करण्यात आल्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या धोरणा प्रमाणे आळंदीत उपक्रम राबविण्यात आला. यास नागरिक, पदाधिकारी व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांनी विशेष सहकार्य करीत मोहिमेत प्रभावी घर भेटीतून आरोग्य तपासणी करण्यात आली.
आळंदी शहरात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाची अंमलबजावणी करण्यात मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी विशेष परिश्रम घेत प्रांत संजय तेली व तहसीलदार सुचित्रा आमले यांचे मार्गदर्शनात नियोजन करून मोहीम राबविण्यात आली. यास शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र शासनाने हे अभियान सुरू केले असून या अभियानात आळंदी शहरातील नागरिकांनी तपासणी करून घेण्यास स्वतः पुढे आल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. आळंदी प्रशासनाच्या मदतीला आळंदीतील शिक्षक, पदाधिकारी व नागरिकांनी धावून जात आळंदी कोरोना मुक्त शहर करण्यासाठी आरोग्य तपासणी अभियान यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे.
या अभियानात शहरातील ९ प्रभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन गृह भेटी देत जनजागृती देखील केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली. जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना समाजात वावरत असताना पूर्णवेळ मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यासाठी आळंदीत डॉक्टरांची टीम व प्रशासन आरोग्य विभाग काम करीत आहे. या वेळी लोकांना मास्कचा शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
आळंदी शहरातील आरोग्य विषयी काम करणाऱ्या संस्था, संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात सहभागी झाल्या . यात प्रशासनास स्थानिक नागरिक, पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य मिळाले.
आळंदीत १०० रुग्ण अँक्टिव्ह
——————
आळंदीत २५ सप्टेंबरला १४ रुग्ण आढळले. तर आज ४ रुग्ण घरी सोडण्यात आले. २५ सप्टेंबर अखेर आळंदीत १०० रुग्ण अँक्टिव्ह आहेत. आळंदीत १२ रुग्णांचे निधन झाले आहे. ६११ रुग्ण बरे होऊन घरी सुखरुप पोहचले असून आळंदीत एकूण ७२३ रुग्ण कोरोनाग्रस्त झाले आहेत.
—-