आळंदीला बंधिस्त नलिकेतुन पाणी पुरवठा योजनेचे कामास गती
महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत भामा-आसखेड धरणातून पुणे महानगरपालिकेला जाणाऱ्या जलवाहिनीतून कुरूळीतील जॅकवेलमधून टॅपिंगद्वारे आळंदी पाणी पुरवठा विकास कामाची सुरुवात उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांचे हस्ते करण्यात आली.
पाणी देण्यासाठी राज्य सरकाराने साडेपाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता असुन आळंदी नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत २८ एप्रिल रोजी कामास मंजूरी देण्यात आली. नगरपरिषदेने ठेकेदाराला कार्यादेश दिल्यानंतर चिंबळी येथून काम सुरू करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात काम सुरू करताना अनेक अडचणी आल्याने आता आळंदी कडील बाजुने बंधिस्त पिण्याचे पाईप नलिका टाकण्याचे काम पाणी पुरवठा सभापती सागर बोरुंदिया यांचे हस्ते सुरु करण्यात आले.
नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांनी संबंधीत ठेकेदाराला आळंदी जलशुद्धीकरण केंद्रापासून काम सुरू करण्यास सांगितले. त्याप्रमाणे कामाची सुरूवात शनिवारी ( दि. २८ ) करण्यात आली. या कामासाठी संबंधित ठेकेदाराला ५५ लाख रुपये दिल्याचे समजते.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, नगरसेवक सचिन गिलबिले, माजी नगरसेवक दिनेश घुले, गणेश कुऱ्हाडे, शुभम काटे, रवी वावरे, सागर साठे आदी उपस्थित होते.