आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर वडमुखवाडी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी यांचे वतीने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय ९ आणि १२ वा अध्यायाचे पारायण, हरिकीर्तन हरिनाम गजरात संपन्न झाले.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायनानंतर महंत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे पुष्प क्रमांक १०६ हृदयस्पर्शी वाणीतून कीर्तन सेवेने सांगता झाली. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने जेष्ठ नागरिक व आधारवड भाविकांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, उपरणे देवून सत्कार करण्यात आला. तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड विष्णू तापकीर यांचे हस्ते उपस्थित भाविक, वारकरी, मान्यवर पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष उद्योजक प्रकाश काळे, माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगावकर, ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय आबा गायकवाड, मनोहर भोसले, हिरामण बुर्डे आदि उपस्थित होते. या प्रसंगी महिला मोर्चाच्या कोषाध्यक्षा शैलाताई मोळक यांचे हस्ते महिला भाविकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमास भाविक, भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला.
००००