आळंदीत नागपंचमी दिनी नागदेवतेची पूजा
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
आळंदी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात परंपरांचे पालन करीत यावर्षी श्रावणातील नागपंचमी सण साजरा करण्यात आला. नेहमी गर्दीने फुलणारे माउली मंदिर मात्र यावर्षी कोरोनाचे पार्शवभूमीवर मोकळे होते. प्रतिकात्मक पद्धतीने आळंदीतील मानकरी कुटुंबातील महिला यांनी परंपरागत पद्धतीने उत्साहात नागदेवतेची पूजा करून नागपंचमी सण साजरा केला.
या प्रसंगी नागदेवताची पूजा करण्यात आली. यावेळी रेखा कुऱ्हाडे, पुष्पा चिताळकर पाटील, ज्योती चिताळकर पाटील , सृष्टी घुंडरे या मानकरी कुटुंबातील महिलांनी नागदेवताची विधिवत पूजा केली. याप्रसंगी व्यवस्थापक मौली वीर, भीमा वाघमारे, सौ. आऊ आदी उपस्थित होते. आळंदीतील माउली मंदीर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेशाने बंद असल्यामुळे मंदीरात विविध प्रकारचे खेळ खेळण्यास होणारी महिला भाविकांची गर्दी मात्र या वर्षी झाली नाही. मंदिरातील परंपरेचे कार्यक्रम परंपरांचे पालन करीत झाल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.