आळंदी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याने केले प्लाझ्मा दान
आळंदी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याने केले प्लाझ्मा दान
महाबुलेटीन न्यूज / अर्जुन मेदनकर
आळंदी : नगरपरीषदेतील कोरोना मुक्त कर्मचारी श्री. मिथिल पाटील यांनी दि.१०/०८/२०२० रोजी कोरोना रुग्णासाठी आपला प्लाझ्मा देऊन एक चांगले विधायक कार्य केले आहे. यासाठी त्यांचे आरोग्यदायी सेवेच्या कार्यातुन इतरांनी प्रेरणा घेऊन कोरोना मुक्त नागरीकांनी आपला प्लाझ्मा दान करावे. तसेच श्री. मिथिल पाटील यांचे कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोना या आजारातून ते नुकतेच बरे झाले आहेत. त्यांनी प्लाझ्मा दान करुन समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
——