आळंदीत रक्षाबंधन उत्साहात, श्रावणी सोमवार निमित्त शिवलिंगाचे कोरोना मुळे बाहेरूनच दर्शन
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
आळंदीतील माउली मंदिरासह परिसरातील घराघरांमध्ये रक्षाबंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे शाळाशाळां मधून होणार सामाजिक बांधिलकी व संस्कृती जपणारा रक्षा बंधन सोहळा साजरा करता आला नाही. आळंदी परिसरातील शिवमंदिराचे बाहेर भाविकांनी देवदर्शनास हजेरी लावत बाहेरून दर्शन घेत श्रावणी सोमवार साजरा करीत धार्मिक परंपरा कायम ठेवली.
श्रावणातील धार्मिक महत्त्व जोपासत मंदिरात अभिषेक पूजा करण्यात आली. रक्षाबंधन दिनी सुरक्षा बंधन संदेश देत खेड तालुका कम्युनिटी डॉक्टर्स व कम्युनिटी कार्यकर्ता यांचे वतीने डॉ. मुरलीधर आरु, अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे वतीने मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या डब्यांचे वाटप समाजरत्न गजानन गाडेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील सुनिल ओव्हाळ यांनी भोसे ग्रामपंचायत यांचेसाठी कामधेनू व तत्वसेवा या संस्थेतर्फे रोग प्रतिकारक शक्ती वर्धक गोळ्यांच्या डब्या व माहिती पत्रके स्वीकारली. यावेळी समाज प्रबोधन करणारी पत्रके सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे यांचे हस्ते वाटप करण्यात आली.