अखिल वारकरी संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी हभप. भरतमहाराज थोरात
अध्यक्षपदी हभप. एकनाथमहाराज सांगोळकर
महाबुलेटिन नेटवर्क / हनुमंत देवकर
पुणे : अखिल वारकरी संघ महाराष्ट्र राज्य पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी हभप. एकनाथमहाराज सांगोळकर, कार्याध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार हभप. भरतमहाराज थोरात यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिन्द्रमहाराज कुंभार यांनी दिली. आळंदी येथे गुरुवारी ( ३० जुलै ) झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली. राष्ट्रीय सचिव हभप. संजयमहाराज हिवराळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
अखिल वारकरी संघ पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-
हभप. एकनाथमहाराज सांगोळकर – अध्यक्ष
हभप. भरतमहाराज थोरात ( पुणे ) – कार्याध्यक्ष
हभप. हरिदासमहाराज पालवे शास्त्री ( अहमदनगर ) – उपाध्यक्ष
हभप. जगन्नाथमहाराज पाटील ( कोल्हापूर ) – सचिव
हभप. दत्तात्रयमहाराज यादव ( सातारा ) – खजिनदार
हभप. गजाननमहाराज सोनुने ( पुणे ) – संघटक
हभप. महेशमहाराज हरवणे ( अहमदनगर ) – जिल्हाध्यक्ष
यावेळी अखिल वारकरी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप. मच्छिन्द्रमहाराज धाणेपकर, उपाध्यक्ष हभप. गोविंदमहाराज गोरे, सचिव हभप. संजयमहाराज हिवराळे, हभप. प्रवीणमहाराज लोळे, हभप. ज्ञानेश्वरमहाराज जाधव, हभप. लक्ष्मणमहाराज पाटील, सल्लागार हभप. आत्माराममहाराज शास्त्री, संघटक हभप. पांडुरंग शास्त्री शितोळे, हभप. सतीश अण्णा वाल्हेकर आदी उपस्थित होते. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.