खेडपुणे जिल्हाविशेष

माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रयत्नांना यश, भाऊंचे स्वप्न झाले पूर्ण…अखेर भामा आसखेड मधून चाकणकारांना पूर्णवेळ पाणी, ,

 

चाकण नळ पाणी पुरवठा योजनेला ६० कोटींची तांत्रिक मान्यता.

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : भामा आसखेड धरणातून चाकण शहरास पूर्णवेळ पाणी मिळावे, हे स्वप्न खेड तालुक्याचे मा. आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांनी पाहिले होते. अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर चाकणकरांचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. ६० कोटी रुपये खर्चाच्या चाकण पाणीपुरवठा योजनेला मंगळवारी ( दि. ८ ) तांत्रिक मान्यता मिळाली आहे. भाऊंच्या निधनानंतर यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पाठपुरावा केला. याबाबतचे अधिकृत पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता संजय पाठक यांनी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे यांना दिले आहे. यासाठी नगरपरिषदेतील सर्व पक्षीय नगरसेवकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!