आगरवाडी जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत कोविड योध्द्यांचा सत्कार
महाबुलेटीन न्यूज
चाकण : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगरवाडी, चाकण येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतिने कोविड योद्धे व शाळेसाठी मदत करणाऱ्या व्यक्तींच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चाकण नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री नानासाहेब कामठे, तर प्रमुख पाहुणे म्हणून चाकण पतसंस्थेचे चेअरमन नितीन गुलाबराव गोरे हे होते. मधुकर छत्रीकर सर यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नारायण बाळासाहेब भोर सर यांनी केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप जाधव, सदस्य जंबुकर, डॉ. तुषार गोरे, डॉ. मंडलिक, पत्रकार हरिदास कड, अविनाश दुधवडे, डामसे सर, इंजिनिअर श्री जंबुकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुश आगरकर, ईश्वर राक्षे, संतोष आगरकर, रविंद्र आगरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेसाठी साउंड सिस्टीम देणारे श्री रविंद्र आगरकर व शाळेसाठी ध्वजस्तंभ बांधुन देणारे श्री संतोषशेठ बाळकृष्ण आगरकर व अंकुशराव बाळकृष्ण आगरकर आणि माजी सभापती रूपाली राजेंद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जोतिर्लिगं मंडळ आगरवाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षक श्री. तुकाराम जैद व सौ. मंदा रामाणे यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.
—–