Saturday, August 30, 2025
Latest:
आदिवासीखेडपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

आदिवासी नेते दशरथ मडावी यांना विधान परिषदेवर घ्या : बिरसा क्रांती दलाची मागणी

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
वाडा : आदीवासी नेते दशरथ मडावी यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दशरथ मडावी हे गेल्या 40 वर्षापासुन फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेशी जूडलेले आहेत. सामाजिक, राजकिय व कला क्षेत्रात त्यांची कामगीरी वाखाण्यासारखी आहे. लेखक, कवि, नाटककार, दिग्दर्शक असे त्यांचे अष्टपैलु व्यक्तिमत्व आमच्या समाजाला लाभले आहे. त्यांनी साहित्याच्या माध्यमातुन समाजाची व्यथा व वास्तविकता मांडली आहे. त्यामुळे त्यांची छाप आदिवासी समाजाबरोबर बहूजन समाजावर देखील पडली आहे. त्यांच्या उत्कृष्ठ वक्तृत्व शैलीमुळे बहूजन समाजात ते लोकप्रिय आहेत. दशरथ मडावी यांना महाराष्र्टातील विविध भागात असणाऱ्या वेगळी जीवनशैली, प्रथा, परंपरा असलेल्या 45 आदिवासी जमातीचा सखोल अभ्यास असुन त्यांचे समाजाशी जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांना महाराष्ट्र शाासनाच्या “आदिवासी मित्र” या पुरस्काराने सन्मानित केले आहे. आदिवासी समाजाला एकसंघ करण्यासाठी त्यांनी सन 2015 ला बिरसा क्रांती दल संघटनेची स्थापना केली आहे. ही संघटना कॅडर बेस असुन आदिवासी समाजातील खूप मोठा युवा वर्ग यात सामील आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या शाखा आहेत. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संर्पक आहे.

अशा बहुआयामी सामाजिक जाण असलेल्या अभ्यासु व्यत्तक्तिमत्वाला आदिवासी समाजाचे व बहूजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधान परिषेदेवर पाठवावे, असा संपूर्ण आदिवासी समाजाचा मानस आहे.

आज महाराष्ट्रात आदिवासींच्या अनेक प्रश्नांवर अनेक प्रश्नचिन्ह असते. या प्रश्नाला उत्तर म्हणजे दशरथ मडावी. मागील बिजेपी सरकारच्या काळात आदिवासीच्या हक्कावर गदा आणण्याचे काम विषमतावादी सरकारकडून करण्यात आले. मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजावर अन्याय, अत्याचार करण्यात आला आहे. आपले सरकार सत्तेवर आल्यावर आदिवासींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आदिवासीचे शोषण, बालमजुरी, आदिवासी विकास विभागाचा भ्रष्टाचार अशा अनेक गोष्टींना वाचा फोडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचा पाठीचा कणा असणारे एक झुंझार नेता दशरथ मडावी यांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन विधानपरिषेदेवर पाठवावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे राज्य सचिव डी. बी. घोडे, उपाध्यक्ष विजय आढारी, संघटक बाळकृष्ण मते, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दशरथ खाडे, संघटक विक्रम हेमाडे, खेड तालुका अध्यक्ष रोहित सुपे, दत्तात्रय गवारी यांनी केली आहे.
……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!