सिंहावलोकन… महाबुलेटीन न्युज झाले एक वर्षाचे!
सिंहावलोकन…
महाबुलेटीन न्युज झाले एक वर्षाचे!
टीम महाबुलेटीन
माध्यम क्षेत्रांमध्ये एक वर्षाचा कालावधी तसा अत्यल्पच म्हणावा लागेल. असे असताना गुणवत्ता या निकषावर मोजपट्टी लावायची झाल्यास, एक वर्षाचा कालावधी स्वतःला सिद्ध करण्यास पुरेसा आहे. याच मोजपट्टीवर महाबुलेटीन न्युजने स्वतःला सिद्ध केले. एक निरपेक्ष, सडेतोड आणि सर्वसामान्यांचे व्यासपीठ म्हणून महाबुलेटीन न्युजने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. स्वतःला सिद्ध केले. माध्यमांच्या भाऊगर्दीत स्वतःचे वेगळेपण ठेवले. स्वतःचे वेगळेपण जपताना उच्च पातळीचा दर्जा राखला. सडेतोड आणि सत्यता याची सांगड घातली. याचाच परिणाम म्हणून महाबुलेटीन न्युज आज सर्वदूर पसरले. स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केला. विविध माध्यमांच्या स्पर्धेत स्वतःची ओळख ठेवली.
‘रियल टाईम न्युज’ हे सूत्र बांधून महाबुलेटीन न्युज नेटवर्कची टीम कार्यरत राहिली. इथे ब्रेकिंगला महत्व न देता वस्तुनिष्ठतेचा गाभा अबाधित ठेवला. त्यामुळे वाचक संख्या दिवसागणिक प्रचंड वाढत राहिली. उण्यापुर्या एक वर्षात वाचकांचा आकडा आठ लाखांच्या आसपास गेला. इतकेच काय एक व्हिडिओ तब्बल अठ्ठावीसशे लोकांनी शेअर केला. तो व्हिडिओ ९४ लाख ५० हजार लोकांपर्यंत पोहोचला. हाच व्हिडीओ अवघ्या दोन महिन्यात ७८ लाख लोकांनी पाहिला. ही आकडेवारी पाहता महाबुलेटीन न्युजवर वाचकांचे किती प्रेम आहे आणि किती लोक जोडले गेले याचा प्रत्यय येतो. स्पर्धेच्या युगात आणि उदंड सोशल मीडियाच्या जमान्यात वरील आकडेवारी निश्चितच अभिमानास्पद आहे. आकडेवारी पहाता महाबुलेटीन न्युजवरील वाचकांचे प्रेम अधोरेखित होते.
खरेतर विश्वासार्हतेचे प्रमाणपत्र वाचक/दर्शक देतात. वाचकसंख्या आणि दर्शकसंख्या यांचा आलेख चढता आहे. त्यामुळेच विश्वास संपादन करून महाबुलेटीन न्यूज आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेऊन आहे. वर्षभराच्या कालावधीत विविधस्पर्शी बातम्या आणि लेख वाचकांपर्यंत पोहचवल्या. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, गुन्हेगारी, आरोग्य, कोरोना, माहिती व तंत्रज्ञान यासंदर्भातील वृत्तांकन जे झाले त्याबद्दल संबंधीत क्षेत्रातून प्रोत्साहित करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या.
एक वर्षाच्या वाटचालीचे सिंहावलोकन करताना आकडेच पुरेसे बोलतात. प्रतिसाद पहाता जबाबदारी वाढत आहे. महाबुलेटीन न्यूज वर्षपूर्तीवर वस्तुनिष्ठ, सडेतोड, रियल टाइम न्यूज, विविधस्पर्शी आणि सर्वदूर बातम्यांचे अभिवचन देत आहे. आपले सर्वांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून महाबुलेटीन न्यूजला दिलेल्या पसंतीबद्दल ऋण निश्चित आहेत.
— हनुमंत देवकर : मुख्य संपादक – 9822364218
— शिवाजी आतकरी : संपादक – 9970719999
००००