Saturday, August 30, 2025
Latest:
पिंपरी चिचंवडपुणे जिल्हामावळविधायकविशेषवैद्यकीयसामाजिक

किशोर आवारे यांची विलक्षण रुग्ण सेवा, उपचार करून सुतार काकांना सोडले घरी…

किशोर आवारे यांची विलक्षण रुग्ण सेवा, उपचार करून सुतार काकांना सोडले घरी.

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
तळेगाव दाभाडे : श्री. पंढरीनाथ सुतार काका… हे तळेगाव स्टेशन परिसरातील शुभम कॉम्प्लेक्स येथे फुटपाथवर गेल्या सहा महिन्यांपासून आजारी अवस्थेत राहत होते. शुभम कॉम्प्लेक्स येथील हॉटेल व्यावसायिक बबलू झोमटे यांना सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी जनसेवा विकास समितीच्या किशोर आवारे यांना संपर्क साधला तसेच सकाळ वाचक कट्टा या पत्रकार गणेश बुरुडे यांच्या ग्रुपच्या माध्यमातून आवारे यांना सुतार काका आजारी असल्याचे समजले. 

श्री. किशोरभाऊ आवारे 

पंढरीनाथ सुतार हे मावळ तालुक्यातील कामशेत जवळील
सांगिसे गावचे रहिवासी असून सदर काकांना जनसेवा विकास समितीच्या वतीने रोज जेवणाची सोय करण्यात येत आहे.
त्यांना तीन महिन्यांपूर्वी सांगिंसे गावात सोडून आल्यानंतर ते पुन्हा शुभम कॉम्प्लेक्स येथे आले आहेत. रोज जनसेवा थाळी येथे येऊन कार्यकर्त्यांशी गप्पा मारतात. सदरची बाब ही किशोरभाऊ आवारे यांना कळल्यानंतर त्यांनी मिलिंद अच्युत यांना पुढील कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. 

पत्रकार विलास भेगडे

जनसेवा विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. विलासजी भेगडे सकाळी 10 वाजता शुभम कॉम्प्लेक्स येथे जाऊन काकांना भेटले. सांगिसे गावचे सरपंच श्री. अनंता ढवळे यांना मिलिंद अच्युत यांनी संपर्क करून सदर काकांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यास सांगितले आहे. पंढरीनाथ सुतार काकांना जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी योग्य उपचार करून सोडण्यात आले.

त्यांना नवनाथ व राजू ही दोन मुले आहेत. नवनाथला अर्धांगवायूचा आजार जडला आहे व राजू बेरोजगार आहे. पंढरीनाथ काका घरी राहत नाहीत, एक दोन महिन्यात पुन्हा ते शुभम कॉम्प्लेक्स पाशी येतात असा इतिहास आहे.

सध्या तरी गावकरी मंडळींना समजवण्यात आल्याने चोख व्यवस्था झाली आहे. सदर पुण्य कार्यात श्री. किशोरभाऊ आवारे यांनी कार्यकर्त्यांना वेळीच सूचना दिल्याने ऐन पावसाळ्यात काकांचे हाल होण्यापासून वाचले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!