Saturday, April 19, 2025
Latest:
अहमदनगरगुन्हेगारीप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

मटणाच्या वाटयावरून दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद 

मटणाच्या वाटयावरून दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद 

अहमदनगर : गावामध्ये सामुहिक कापलेल्या बोकडाचा वाटा करण्यावरून झालेल्या वादात दोन गट एकमेकांवर भिडले. दोन्ही गटामध्ये काठ्या, कुर्‍हाडी, दगडाने झालेल्या हाणामार्‍यात आठ जण जखमी झाले आहेत. नगर तालुक्यातील बाळेवाडी गावामध्ये ही घटना घडली. दोन्ही गटाने नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मंगल बाबासाहेब पालवे (वय 35 रा. बाळेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल पोपट पालवे, गणेश पोपट पालवे, पोपट दत्तू पालवे, राजेंद्र दत्तू पालवे, प्रकाश दादाबा पालवे, रोहीत राजेंद्र पालेव, सिमा गणेश पालवे (सर्व रा. बाळेवाडी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या गटाच्या सिमा गणेश पालवे (वय 25) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत ऊर्फ दाद्या बाळासाहेब सानप, परमेश्‍वर ऊर्फ भमड्या बाबासाहेब पालवे, बाबासाहेब मोहन पालवे, धनेश्‍वर बाबासाहेब पालवे, मंखाबाई बाबासाहेब पालवे, बाळासाहेब गंगाधर सानप, कचरू शहादेव घुले, नवनाथ गहिनाथ घुले, (सर्व रा. बाळेवाडी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही गटातील 10 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत व उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!