तळेगाव शहरात वीकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव शहरात वीकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि
प्रादुर्भाव रोखण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या वीकेंड लाॅकडाऊनला तळेगाव शहरातील व्यापारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ नियमावलीत नवीन बदलांचा समावेश केला आहे. वीकेंड लॉकडाऊन’ मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करीत शहरात अत्यावश्यक सेवेतील औषधांची दुकाने, दवाखाने, हॉस्पिटल या सुविधा उपलब्ध होत्या. पानाच्या टपरीसह सर्व दुकाने कडकडीत बंद होती. त्यामुळे शहारातील मुख्य बाजारपेठ, नेहमी गजबजणारे चौक ओस पडले होते.
रविवारी सकाळी ११ नंतर अत्यावश्यक सेवेतील सर्व दूध डेअरी बंद झाल्याचे पहावयास मिळाले. अत्यावश्यक सेवेतील नागरीक रस्त्यावर दिसत होते. विनाकारण घराबाहेर पडणारांची
पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत होती. लिंब फाटा, स्टेशन चौक, मराठा क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी वाहनांची कडक तपासणी करण्यात येत होती. तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे भरारी पथक गस्त घालत होते. पोलिसांकडून प्रवाशांची चौकशी केली जात होती. खातरजमा केल्यानंतर सोडले जात होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, देहूरोड तळेगाव वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, पोलीस उपनिरीक्षक रवी हिंगोले, एस. ए. खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
—–