जुन्या भांडणाच्या वादातून १७ वर्षाच्या मुलाचा खून, एका तरुणासह दोन बालकांना चाकण पोलिसांनी चार तासात केली अटक
जुन्या भांडणाच्या वादातून १७ वर्षाच्या मुलाचा खून, एका तरुणासह दोन बालकांना चाकण पोलिसांनी चार तासात केली अटक
महाबुलेटीन न्यूज
चाकण : मेदनकरवाडी ( ता. खेड ) गावच्या जुन्या भांडणाच्या वादातून एका १७ वर्षाच्या मुलाला काठी व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. सदर मुलगा आज रुग्णालयात मयत झाला असून तीन जणांवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना चार तासाच्या आत अटक केली आहे.
अभिषेक संतोष फुलंब्रीकर ( वय १७, रा. अमृतनगर, मेदनकरवाडी, चाकण ) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी गणेश भैरू रेड्डी ( वय २५, रा. वैदू वस्ती, बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण ) याच्यासह दोन विधींसंघर्षित बालकांना अटक केली आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.