खराबवाडीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद, तीन दिवसांत ७४० ग्रामस्थांचे लसीकरण, उद्याही लसीकरण सुरू…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती खेड यांच्या मार्गदर्शनाखाली खराबवाडी ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायत, कोरोना समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र करंजविहिरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक मोफत लसीकरणास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तीन दिवसांत ४५ वयाच्या पुढील ७४० नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
शनिवारी २२३, रविवारी ३२८ व सोमवारी १८९ असे एकूण ७४० ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेतले.
खराबवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवार दि.३ एप्रिलपासून लसीकरण सुरू असून उद्या मंगळवारी ही लसीकरण होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन, डॉ. निलेश मोहिते, तलाठी श्रीधर आचारी, ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांनी केले आहे.
या लसीकरण शिबिरासाठी पोलीस पाटील किरण किर्ते, आरोग्य सेवक मकसूद शेख, मीना ताजने, ग्रामपंचायत कर्मचारी अजित केसवड, विठ्ठल वर्ये, सुनील खराबी, विशाल खोपडे, सारिका जाधव, गणपत कड, शंकर धोत्रे, कल्पना जाधव, सर्व कर्मचारी, आशा वर्कर सेविका मंदा कड, रेखा धाडगे, कविता म्हस्के, रंजना लांडे, आशा जंबुकर, जयश्री काळकुंड, शुभांगी शिंदे, संगणक ऑपरेटर भूषण हटवाल, प्रथमेश कांबळे यांचेसह गावातील तरुण, महिला वर्ग, जेष्ठ नागरिक व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.
————-