Friday, April 18, 2025
Latest:
आंबेगावपुणे जिल्हाप्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रमुंबईराजकीयविशेष

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री ; उद्धव ठाकरे यांचं राज्यपालांना पत्र… ● उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे…

उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 
● कामगार विभागाचा कार्यभार आता हसन मुश्रीफ यांच्याकडे

महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज (सोमवार) गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले असून, १५ दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर याबाबत निर्णय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. तसेच, इथून पुढे गृहमंत्रालयाची जबाबदारी आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राहणार असल्याचेही कळवले आहे.

तर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा कार्यभार आता हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!