Saturday, April 19, 2025
Latest:
जयंतीजुन्नरपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

छत्रपती शिवराय देशाची अस्मिता : शाहीर हेमंत मावळे

छत्रपती शिवराय देशाची अस्मिता : शाहीर हेमंत मावळे

महाबुलेटीन न्यूज 
जुन्नर ( आनंद कांबळे ) : छत्रपती शिवराय देशाची अस्मिता आहे. त्यामुळे राजांची जयंती साजरी व्हायलाच हवी. सध्या देशात कोरोनाचे संकट चालू आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटाचा विचार करता संपुर्ण काळजी घेत तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली गेली पाहिजे. कोरोना वाढू नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. या शिवजयंती प्रसंगी प्रशासनास सहकार्य करणे ही आपलीही जबाबदारी आहे. या समयी संकटाचा मुकाबला करणा-या सर्व कोरोना योद्ध्यांचे आभार मानणे आपले कर्तव्य आहे. अशा शब्दात शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, दगडुशेठ हलवाई मंडळाचे उपाध्यक्ष सुनिल रासने, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत डोके, विकास राऊत, दत्ता गवारी, निलेश चव्हाण, सुर्यकांत थोरात, अॅड. सचिन चव्हाण, माजी सभापती संगिता वाघ, शिवनेरी स्मारक समितीचे उपाध्यक्ष गणेश टोकेकर, मधुकर काजळे, मकरंद पाटे, संजय खत्री, गोविंद हिंगे, चंद्रहास जोशी, राहुल लवांडे, अक्षय गायकर, सोनु पुराणिक, अक्षय झनकर, वसंत साळवे, शिवप्रेमी व व्रतधारी उपस्थित होते.

तत्पुर्वी सकाळी सुनिल रासने व संगिता रासने यांच्या हस्ते शिवाई देवीस अभिषेक, शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थळ सवाद्य छबिना मिरवणुक, पारंपारिक पाळणा व जन्मोत्सव, ध्वजारोहण, बालराजे व जिजाऊंना अभिवादन असे कार्यक्रम उत्साहात साजरे झाले. यावर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्कार सुरेखा वेठेकर यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन मधुकर काजळे यांनी केले. रमेश खत्री यांनी सूत्रसंचालन केले, तर हिंगे सर यांनी आभार मानले.

● शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत डोके, विकास राऊत, दत्ता गवारी, निलेश चव्हाण, सुर्यकांत थोरात, अॅड. सचिन चव्हाण, माजी सभापती संगिता वाघ यांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जे रोप लावले होते त्याची पाहणी केली. वनविभागाकडून रोपाची चांगली काळजी घेतल्याचे निदर्शनास आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!