चाकण शहर वारकरी सेवा फाऊंडेशनची कार्यकारिणी जाहीर.. ● अध्यक्षपदी वत्सलाताई बिरादार, उपाध्यक्षपदी राजश्रीताई रामशेठ गोरे यांची नियुक्ती
महाबुलेटीन न्यूज
चाकण : वारकरी सेवा फाऊंडेशन, चाकण या सांप्रदायिक संस्थेच्या कार्यकारिणीवर वारकरी महीला मंडळाची निवड करण्यात आली. चाकण येथील झित्राईमंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करून नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी सौ. वचछलाताई बिरादार याची अध्यक्षपदी, तर सौ. राजश्रीताई रामशेठ गोरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
■ चाकण वारकरी महिला मंडळाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-
● सौ. वत्सलाताई बिरादार – अध्यक्ष,
● सौ. राजश्रीताई रामशेठ गोरे – उपाध्यक्ष
● जयश्रीताई गणाचार्य – सचिव,
● सौ. लताताई सिरसाठ – खजिनदार,
● सुमनताई उटे – सल्लागार,
● सौ. चतुरताई, ● सौ. छायाताई गोरे, ● लिलाबाई भुजबळ, ● सौ. पाटीलताई, ● सौ. लटकेताई, ● सौ. कदमताई, ● सौ. चामवाडताई, ● सौ. जाधवताई, ●सौ. बरडेताई, ● सौ. तेलीताई, ● सौ. सुर्यवंशीताई, ● सौ. सुनिताताई राक्षै आदी महिलांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
हा पदनियुक्ती वितरण सोहळा हभप. भरत महाराज थोरात, हभप. पांडुरंग महाराज शितोळे, हभप. सांगोळकर महाराज, हभप. हिवराळे महाराज, हभप. सतिश महाराज बोराटे, हभप. नलावडे महाराज, हभप. लक्ष्मण महाराज पाटील, हभप. शास्त्री महाराज, हभप. लटके महाराज, हभप. गणेश शास्त्रीजी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
———-