चाकण मध्ये सव्वा पाच लाखांच्या गुटख्यासह पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त… ● चाकण पोलिसांची कारवाई
चाकण मध्ये सव्वा पाच लाखांचा गुटखासह पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त…
● चाकण पोलिसांची कारवाई
महाबुलेटीन न्यूज
चाकण : अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्यास अटक करुन त्याच्याकडून तब्बल सव्वा पाच लाखांचा गुटखा आणि साडेतीन लाखांचा टेम्पो असा एकूण पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नीरज जसराम बंसल (21, रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. मध्य प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे एका टपरी मध्ये अवैधरीत्या गुटखा विक्री सुरु आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपी निरज बंसल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ हजार 850 रुपये किमतीचा पान मसाला व तंबाखू असा गुटखा जप्त केला.
आरोपी नीरज बंसल याने हा गुटखा अंकुर गुप्ता याच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी अंकुर गुप्ता याचा ठावठिकाणा शोधून त्याच्याकडून पान मसाला तसेच अन्य प्रकारचा गुटखा आणि एक टेम्पो जप्त केला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण आठ लाख 76 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडल 1इप्पर मंचक, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, आर. एम. झनकर, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, संदीप सोनवणे, मच्छिन्द्र भांबुरे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल वरपे, मनोज साबळे, अशोक दिवटे, प्रदीप राळे यांनी केली.
चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
——