काव्यमंच : वारसा
वारसा
———
आम्हा साठी सुरु केली
माय सावित्रीने शाळा
क ख ग घ च छ ज झ
असा लाविलाही लळा॥धृ॥
हिच्या विना कोणतेही
गाणे रुचेनाच गळा
हिने शिकविली कशी
खुलवावी शब्दकळा॥१॥
ज्ञान सागरातून हा
उमळला शब्दमळा
शब्दमळा भावमळा
मला भावला आगळा॥२॥
सत्यधर्म जोतिबाचा
माऊलीने फुलविला
आसमंत ज्योतीने त्या
अवघाच दिपविला॥३॥
कन्या जोती- सावित्रीची
मीही मिरविते मला
जीव असे तो जीवात
‘वारसा’ मी चालविला॥४॥
— निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे, धुळे
———