कोविड लस परिणाम कारक : पोलीस उपायुक्त आनंद भोईटे…. ● कोविड लसीकरणास अथर्व हॉस्पिटल तळेगाव येथे प्रारंभ… ● ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाबुलेटीन न्यूज : मिलिंद अच्युत
तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन येथील शासनमान्य कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या हस्ते झाले. अथर्व हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या या केंद्राच्या पहिल्याच दिवशी वयोवृद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दर दिवशी मान्यताप्राप्त १०० नागरिकांना या केंद्रात लसीकरण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख डॉ. अजित माने आणि डॉ. राजेंद्र देशमुख यांनी दिली.
कोरोना महामारीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने कोविड 19 ची लस देण्याची मान्यता तळेगाव येथील सुप्रसिद्ध अथर्व मल्टीस्पेसिएलिटी हॉस्पिटल यांना प्रदान करण्यात आली आहे. कोविड 19 ची लस कोविशिल्ड सिरम इन्स्टिट्यूट या संस्थेची आहे. आता पर्यंत तपासणी अभ्यासानंतर लस सुरक्षित असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आला आहे. अथर्व हॉस्पिटल येथे कोविड सेंटर सुरू होते. शून्य टक्के मृत्यू दर हे अथर्व हॉस्पिटलचे वैशिष्ट्ये आहे.
उदघाटन प्रसंगी तळेगाव दाभाडे काँग्रेस आयचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी अथर्व हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. अजित माने व डॉ. राजेंद्र देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. कोरोना काळातील अथर्व हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे, आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ यांनी खरी रुग्ण सेवा केल्याचे खळदे यांनी नमूद केले. लसीकरण केंद्राचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजनाने झाली.
यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त आनंद भोईटे, माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, नगरसेविका संगीता शेळके, आरोग्यमित्र तथा जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलींद अच्युत, डॉ. सुदीप कुमार, डॉ. युवराज बढे, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. अजित माने, सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान आदी मान्यवर उस्थितीत होते.
यावेळी आनंद भोईटे म्हणाले की, पोलीस आणि वैद्यकिय क्षेत्रातील फ्रंट लाईन वॉरियर्स यांनी देखील लस टोचून घेतली आहे. ही लस प्रमाणित आणि परिणामकारक असल्याचे त्यामुळे सिद्ध झाले आहे. शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार ही लस टप्याटप्याने घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. सोशल मीडियातून लसीबाबत गैरसमज पसरवले जात असून त्याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे.
यावेळी डॉ. अजित माने यांनी कोविड लसीकरणाची माहिती दिली. या उपक्रमाबद्दल यादवेंद्र खळदे, संगीता शेळके यांनी समाधान व्यक्त केले. पहिली लस ज्येष्ठ निवेदक अनील धर्माधिकारी यांना देण्यात आली.
—–
● अथर्व हॉस्पिटल हे अद्ययावत सोयी व सुविधा उपलब्ध असलेले हॉस्पिटल असून रुग्ण सेवा हेच आमचे उद्दिष्टे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, आम्ही सदैव रुग्ण सेवे साठी तत्पर राहू.
— डॉ. अजित माने
संचालक : अथर्व हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे
—————
● कोविशिल्ड ही सिरम इन्स्टिट्यूटची परिणाम कारक लस अथर्व हॉस्पिटल येथे उपलब्ध असून रुपये २५० इतके शासनमान्य शुल्क आकारले जात आहे. नोंदणीकृत रुग्ण या लसीचा लाभ घेऊ शकणार आहेत.
— डॉ राजेंद्र देशमुख
संचालक : अथर्व हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे
—————
● अथर्व हॉस्पिटलचे कोरोना काळातील काम गौरवास्पद असून आम्ही आगामी काळात अथर्व हॉस्पिटल प्रशासनाच्या सर्व समाजोपयोगी कार्यात हातभार लावू.
— श्री. यादवेंद्र खळदे
अध्यक्ष : तळेगाव शहर काँग्रेस आय कमिटी,
माजी उपनगराध्यक्ष
—————