● उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा करूनही विद्यूत कर्मचारी जर वीज बिलांबाबत आडून बसणार असतील, तर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
● किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची एकजूट : नगरसेवक संतोष शिंदे
महाबुलेटीन न्यूज : मिलिंद अच्युत तळेगाव दाभाडे : येथील सर्व पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या तळेगाव विभागाचे प्रमुख उपअभियंते राजेंद्र गोरे यांना तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांचा विद्युत पुरवठा थकीत बिलांअभावी खंडित न करण्या बाबत निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी संसदेत थकीत बिलांमुळे रहिवासी वीज जोडणी धारक व शेतकरी यांचा वीज पुरवठा पुढील निर्णय होई पर्यंत तोडू नये, अशी घोषणा केली, त्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु तळेगाव दाभाडे परिसरात विद्युत महामंडळाचे कर्मचारी थकीत बिलांबाबत तगादा लावत असल्याचे निदर्शनास आले आहे, तसेच थकीत बिले न भरणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्षीय पदाधिकारी उपअभियंता राजेंद्र गोरे यांना भेटून परिसरातील नागरिकांच्या व्यथा निवेदनातून मांडल्या.
तळेगाव स्टेशन येथील व्यापारी भरत वस्तीमल ओसवाल यांच्या घराचा विद्युत पुरवठा तोडण्यात आला, सदर विद्युत कर्मचारी यांना वारंवार विनंती करूनही ते थकीत बिलांबाबत आडून बसले होते. परंतु भरत वस्तीमल ओसवाल यांनी जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधल्या नंतर वीज पुरवठा पुन्हा जोडण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा करूनही विद्यूत कर्मचारी जर वीज बिलांबाबत आडून बसणार असतील, तर सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनाच्या मार्गाने प्रश्न सोडवतील, असे युवा नेते चिराग खांडगे यांनी नमूद केले आहे.
लॉकडाउन मुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या नागरिकांना थकीत बिलांबाबत सुलभ हफ्ते करून द्यावेत तसेच विद्युत कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा कुठल्याही कारणास्तव तोडू नये, असे नगरसेवक संतोष शिंदे यांनी सांगितले. विद्युत उपअभियंता राजेंद्र गोरे यांनी सर्व पक्षीय शिष्टमंडळाला सहकार्य करण्याचे व थकीत वीज बिलांसाठी ३ ते ४ सुलभ हफ्ते करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदन देण्यासाठी नगरसेवक संतोष शिंदे, युवा नेते चिराग खांडगे, जनसेवा विकास समिती प्रवक्ता मिलिंद अच्युत, रिपब्लिकन पार्टी तळेगाव शहराध्यक्ष सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष केशव कुल, शिवसेना माजी शहराध्यक्ष सुनील उर्फ मुन्ना मोरे, अनिल धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यूत महामंडळाच्या वतीने उपअभियंता राजेंद्र गोरे यांनी निवेदन स्वीकारले.
भरत ओसवाल
● “माझ्या घरातील विद्युत पुरवाठा बंद करण्यात आला होता, परंतु जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी वीस मिनिटात विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करून दिला. जनसेवा विकास समिती बद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे”
— भरत ओसवाल, कपडा व्यापारी
तळेगाव स्टेशन
——————–
राजेंद्र गोरे MSEB उपअभियंता
● सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारले असून विद्युत पुरवठा खंडित करणे तातडीने थांबवले आहे, थकीत वीज बिलांना सुलभ हफ्ते करून देऊ.
— राजेंद्र गोरे, विद्युत उपभियंता
तळेगाव दाभाडे
——————-
संतोष शिंदे नगरसेवक
● किशोरभाऊ आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्षीय एकजूट स्थानिक प्रश्नांसाठी उभी रहात आहे, विषय तडीस नेण्याची ताकद आवारे यांच्यात आहे.
— संतोष शिंदे, नगरसेवक
तळेगाव दाभाडे नगरपरिषद
————————-
चिराग खांडगे
● “जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ आवारे यांचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु आहे.
किशोरभाऊ यांच्या नेतृत्वाखाली नवीन पिढी तयार होत आहे. भविष्यात मावळ तालुक्याला भाऊ नक्कीच नवीन दिशा देतील यात शंका नाही.”
— चिराग खांडगे, युवा नेते
————————-