Friday, April 18, 2025
Latest:
आंदोलनखेडपुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन न्यूज : केंद्र सरकारने जर इंधन दरवाढ थांबवली नाही, तर याहीपेक्षा उग्र आंदोलन छेडण्यात येईल : शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे यांचा इशारा, शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात तहसील कचेरी समोर छेडले आंदोलन

 

महाबुलेटीन न्यूज 
राजगुरूनगर : शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात तहसील कचेरी समोर शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. “केंद्र सरकारने जर इंधन दरवाढ थांबवली नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल”, असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, लोकनेते अशोकराव खांडेभराड, मा. तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, महिला आघाडी तालुका प्रमुख नंदाताई कड, सभापती भगवान पोखरकर, मा. उपसभापती ज्योतीताई आरगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजाताई घनवट, उपतालुका प्रमुख केशव आरगडे, सह सल्लागार विश्वास नेहेरे, किरण गवारी, अंबर सावंत, बाप्पू थिटे, अनिल मिसर, सचिन राक्षे, श्याम खैरे तसेच शिवसेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!