Saturday, August 30, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाविशेषशैक्षणिकसण-उत्सव

महाबुलेटीन न्यूज : कोरोनामुळे यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांविना खराबवाडीत प्रजासत्ताक दिन साजरा

 

ग्रामस्थांच्या हस्ते मंगलताई देवकर यांचा नागरी सत्कार…

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार यंदाच्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांविना गावातील निवडक ग्रामस्थ व दोन्ही शाळांच्या शिक्षकांच्या उपस्थितीत केवळ झेंडावंदन करून प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.

यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई हनुमंत देवकर यांची भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या NDRF च्या महिला लैंगिक शोषण तक्रार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व सर्व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

 

खराबवाडी येथील ग्रामपंचायत समोर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व प्रशासक बापूसाहेब कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांनी ध्वजारोहण केले. मंगलताई देवकर, माधुरीताई खराबी, भाजपचे युवा नेते संदीप सोमवंशी, पोलीस पाटील किरण किर्ते, माजी चेअरमन दिनकर कड, संदीप कड, लक्ष्मण खराबी व शाळेतील ५ शिक्षकांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई देवकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा माधुरीताई खराबी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका खजिनदार अरुण सोमवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ खराबी, अनंतकृपा पतसंस्थेचे माजी चेअरमन सोपान खराबी, माजी चेअरमन खंडू केसवड, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन हनुमंत खराबी यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.

 

नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश खराबी, खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोरक्षनाथ कड व मुख्याध्यापक अविनाश कड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच हनुमंत अनंतराव कड व माजी उपसरपंच काळुराम केसवड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मनसे जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी व डॉ. सागर सोमवंशी यांनी ध्वजपूजन केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेचे सर्व संचालक, ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, तरूण मंडळांचे कार्यकर्ते, पालक वर्ग, महिला भगिनी व सर्व शिक्षक उपस्थित होते. विजय डावरे व संतोष भुते यांनी सूत्रसंचालन केले.
=======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!