खेड तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतवर सर्वात कमी वयाच्या उच्चशिक्षित तरुणाची निवड
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
काळुस : खेड तालुक्यातील लोकसंख्येने सर्वांत मोठया ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या काळूस ग्रामपंचायतमध्ये कु. दत्तात्रय नामदेव पोटवडे हे निवडून आले आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या गावात सर्वात कमी 23 वयात निवडून येण्याची किमया त्यांनी साधली आहे.
त्यांनी थोड्या फरकाने नाही तर 191 मतदानाच्या फरकाने ते निवडून आले आहेत. एवढ्या मोठ्या गावात त्यांची ही कामगिरी उल्लेखनीय आहे. ते उच्चशिक्षित असून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केली आहे. परंतु त्यांनी नोकरी न करता समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गावचा विकास कसा करता येईल याकडे जास्त भर दिला. जनसामान्यांच्या मनातले त्यांच्याविषयी प्रेम आणि गावच्या विकासाचा दुरदृष्टिकोन त्यामुळे त्यांना हा एवढ्या कमी वयात विजय साधता आला. ते गोर गरिबांच्या मदतीला अर्ध्या रात्रीला देखील धावून येतात. त्यांच्या ह्या कामाचे फळ म्हणून काळूस गावाने इतिहास घडवला आहे.
काळूस गावामध्ये इतक्या लहान वयात त्यांच्यावर विश्वास ठेवून तसेच त्यांना निवडुन आणून त्यांचे नेतृत्व गावाने मान्य केले आहे. यातून काळूस गावात युवा पर्वाचा आरंभ दिसून आला आहे. काळूस गावातील मतदारांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानून मतदारांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.
—