कासारवाडी येथील वारकरी संप्रदायातील जेष्ठ कार्यकर्त्या लिलाबाई सातव यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
पिंपरी-चिंचवड : कासारवाडी येथील वारकरी संप्रदायातील लिलाबाई बबन सातव ( वय ७० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सातव, उद्योजक सतीश ( बापू ) सातव यांच्या त्या मातोश्री, तर तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव भेगडे व सामाजिक कार्यकर्ते आनंद भेगडे यांच्या त्या भगिनी होत.