नाणेकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ५ बिनविरोध… बाबू नाणेकर, तृप्ती नाणेकर व रेखा जाधव यांची झाली बिनविरोध निवड…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) ग्रामपंचायत निवडणूक २०२१-२५ मध्ये वॉर्ड क्रमांक ५ मधील तीन उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या वॉर्डातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून तृप्ती संदेश नाणेकर, सर्वसाधारण गटातून रावसाहेब उर्फ बाबू नाणेकर, तर सर्वसाधारण महिला गटातून रेखा शिवाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या वार्डात सर्वसाधारण गटात रावसाहेब नाणेकर यांचा एकमेव अर्ज आला होता, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात तृप्ती संदेश नाणेकर रुपाली रुपेश नाणेकर आणि सर्वसाधारण महिला गटात रेखा शिवाजी जाधव व शैला कल्पेश नाणेकर यांचे उमेदवारी अर्ज आले होते. रुपाली नाणेकर व शैला नाणेकर यांनी आज माघार घेतल्याने ५ क्रमांकाचा वॉर्ड बिनविरोध झाला आहे.त्याचप्रमाणे गावातील इतर वॉर्डही बिनविरोध करण्यासाठी गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.