Saturday, August 30, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाविधायकविशेषसामाजिक

खराबवाडीत माणुसकीच्या भिंतीचे उदघाटन संपन्न, ‘गरज नसेल ते आणून द्या, आणि गरज असेल ते घेऊन जा’ या स्तुत्य उपक्रमाला भरभरून प्रतिसाद

खराबवाडीत माणुसकीच्या भिंतीचे उदघाटन संपन्न,
‘गरज नसेल ते आणून द्या, आणि गरज असेल ते घेऊन जा’ या स्तुत्य उपक्रमाला भरभरून प्रतिसाद

महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथे गावचे माजी उपसरपंच व उद्योगपती प्रकाशशेठ खराबी यांच्या हस्ते ‘माणुसकीची भिंत’ या विधायक उपक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. येथील युवा कार्यकर्ते दत्ताराज खराबी यांच्या संकल्पनेतून ‘गरज नसेल ते आणून द्या, आणि गरज असेल ते घेऊन जा’ ह्या उपक्रमांतर्गत गरीब व गरजू नागरिकांसाठी कपडे या भिंतीवर मिळणार आहेत. 

आपल्या घरात अनेक जुनी कपडे वापराविना पडून असतात, त्याचा गरजूंना लाभ व्हावा, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी माजी सरपंच नागेश खराबी, माजी उपसरपंच काळुराम केसवड, अनंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन माणिक खराबी, युवा उद्योजक राहुल कड, पत्रकार हनुमंत देवकर, युवा उद्योजक राजेंद्र खराबी, अमर खराबी, प्रयाग खराबी, राजेंद्र कड, तुषार खराबी, शुभम खराबी, राहुल खराबी, पांडुरंग शिंदे, वनिता खराबी, वंदना खराबी, सविता खराबी, योगिता खराबी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!