राजगुरुनगर येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर प्रतिनिधी (दि. २४) : राजगुरुनगर येथील भीमानदी तीरावर वसलेले श्री दत्त मंदीर हे प्राचीन मंदीर असून; श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी येथे दत्त जयंती उत्सवाचे आयोजन सोमवार (दि. २८) ते बुधवार (दि. ३०) या तीन दिवसात करण्यात येणार असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष व राजगुरूनगर सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष प्रताप आहेर व रवींद्र जोशी यांनी दिली.
सोमवार (दि.२८) रोजी सकाळी ८ वा. आभिषेक, महापूजा व प्रेमध्वज पूजन यजमान नथुराम तनपुरे यांचे हस्ते करुन उत्सवास प्रारंभ होणार आहे. नंतर गायत्री यज्ञ यजमान बापु शेट्ये यांचे हस्ते पार पडणार असून संयंकाळी प्रेमध्वज पूजन होऊन प्रेमध्वजाची मिरवणूक निघून मंदिरात ध्वजारोहण
करण्यात येईल. यावेळी प्रताप आहेर, अविनाश नाणेकर, राजेंद्र बरबटे, ऍड. गणेश होनराव, बाबा साळुंके, ऍड. अतुल घुमटकर, प्रभाकर जाधव व सर्व गुरुबंधू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मंगळवार (दि. २९) रोजी सकाळी ७ वा. श्रींची महापूजा व “ओम नमः शिवाय” चा अखंड मंत्रजागर यजमान समीर आहेर यांच्या हस्ते होऊन; दुपारी श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन व सायंकाळी दत्त जन्मावर ह.भ.प. विठ्ठल महाराज गुंडाळ यांचे प्रवचन होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तदनंतर आरती व भाविकांना सुंठवडा वाटप केले जाणार आहे. रात्रौ ८ वाजता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व मास्क परिधान केलेल्या गुरुबंधुच्या उपस्थितीत
ग्रामप्रदक्षिणा तसेच भजन पालखीसेवा होणार आहे.
बुधवार (दि. ३०) रोजी दुपारी ३ वा. श्री दत्त विश्वस्त मंडळाचे वतीने भजनसेवा व सामुदायिक मंत्रजप होवून श्रींची आरती आणि विशाल घुमटकर यांच्याहस्ते महाप्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता होणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष प्रताप आहेर, कार्याध्यक्ष रविंद्र जोशी, उपाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, खजिनदार हनुमंत सैद, प्रकाश तेंडोलकर, प्रभाकर जाधव, पांडुरंग साळुंके, अविनाश नाणेकर, नथुराम तनपुरे, रविंद्र सांडभोर, माणिक तनपुरे, अजित डोळस, नारायण जाधव, समीर आहेर, बाबा साळुंके, ऍड. गणेश होनराव, मंदार पिसाळ, शरद चोपडे, कमल पिसाळ, कुसुम तनपुरे, जनाबाई सैद, जयश्री आंबडेकर, सुनंदा दहितुले, आदी गुरू बंधूं- भगिनी करणार असल्याची माहीती जगन कुंभार यांनी दिली.
यावेळी कोरोना महामारीचा संसर्ग लक्षात घेता मर्यादीत भाविकांमध्येच उत्सव साजरा करण्यात येणार असून भाविकांनी व सर्व गुरू बंधूंनी सोशल डिस्टन्सचे पालन तसेच मास्कचा वापर कटाक्षाने करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.