Thursday, April 17, 2025
Latest:
विशेष

महाबुलेटीन न्यूज : 21 डिसेंबर 2020 – आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

महाबुलेटीन न्यूज : 21 डिसेंबर 2020 – आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी 

● ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी; कोरोनाच्या नव्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय

● सिक्कीममधील नाथूलाजवळ लष्कराचे वाहन दरीत कोसळून अपघात, तीन जवानांसह एका मुलाचा मृत्यू

● काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे निधन; दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

● ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित, जीएसीएकडून अधिसूचना जारी

● राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

● कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा मोठा फटका; मुंबई शेअर मार्केटचा सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला

● महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी, अशी माझी इच्छा; देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

● सॅमसंगचा ‘Galaxy S21 Altra’ हा स्मार्टफोन जबरदस्त कॅमेऱ्यासह लाँच

● भारतात परतण्याआधी कर्णधार विराट कोहली घेणार संघाची बैठक, विराट बैठकीत खेळाडूंना मार्गदर्शन करणार

● दिग्दर्शक समीर पाटील यांच्या ‘डार्लिंग’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चित्रपट 26 जानेवारीला प्रदर्शित होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!