निमगाव खंडोबा येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासंदर्भात बैठक संपन्न…
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
निमगाव : आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारक समिती खेड तालुका शिष्टमंडळाची निमगाव खंडोबा येथे स्मारकासाठीच्या जागेमध्ये राजे उमाजी नाईकांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा झाली. शिवसेना खेड तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर सविस्तर बैठक पार पडली. याप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक दिपक धनवटे, रोहिदास मदने, विजु धनवटे, सुभाष जाधव, मनोहर गोरगले, राहुल भंडलकर, अनिल चव्हाण, सनी धनवटे व इतर मान्यवर उपस्थित होते.