Saturday, August 30, 2025
Latest:
अध्यात्मिकखेडपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

हरिनामाच्या गजरात आळंदी येथील माऊली मंदिर भाविकांसाठी केले खुले.. दिवसभरात १० हजार भाविकांनी घेतले दर्शन..

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
आळंदी ( प्रतिनिधी ) : दिवाळी पाडवा सोमवारी ( दि.१६ ) राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात सकाळी सहाचे सुमारास  प्रथापरंपरांचे तसेच धार्मिक विधी अभिषेक पूजा झाल्यानंतर भाविकांच्या दर्शनास खुले करण्यात आले.

या निमित्त दिवाळी पाडव्याची पहाट पुजा प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांचे हस्ते झाली. यावेळी विश्वस्त योगेश देसाई, व्यवस्थापक माऊली वीर आदी उपस्थित होते. देवस्थान तर्फे शासनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नियोजन करण्यात आले. दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. मंदिराबाहेर साखर फुटाणे, पेठे वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करीत हरिनाम गजरात माऊली मंदिर भाविकांना दर्शनास खुले करण्यात आले.

ठराविक अंतराने स्वच्छतेसाठी दर्शन काही वेळ बंद ठेवण्यात आले. भाविकांसह विविधा पक्ष संघटनांनी या शासन निर्णयाचे स्वागत करीत दर्शन घेतले. दिवसभरात दहा हजारावर भाविकांनी दर्शन घेतल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. आजोळघर रामवाडा दर्शन बारीतून दर्शनास भाविकांना प्रवेश देत दर्शना नंतर पान दरवाजातून बाहेर सोडण्यात आले. पंखा मंडपातून भाविकांना श्रीचे दर्शन देण्यात आले.

शासनाच्या मार्गदर्शक सूचना व अटी शर्तीना अधीन राहून आळंदी मंदिर देवदर्शनास खुले करण्यात आले. स्थानिक मंदिर व्यवस्थापन व महसूल प्रशासन यांनी बंधने घालून दिली त्याप्रमाणे आळंदीत नियोजन करण्यात आले. आळंदी मंदिर भाविकांसाठी दररोज सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत खुले राहणार आहे. यात ठराविक कालावधी नंतर मंदिर स्वच्छता करण्यास अर्धा तासांसाठी दर्शन बंद करण्यात येत होते.

आळंदी पंचक्रोहीतील भाविकांनी दर्शनास गर्दी करून या शासन निर्णयाचे स्वागत केले. मंदिरात दर्शनास ये-जा करताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे पालन करून भाविकांना देवदर्शन सुलभ होईल, यासाठी मंदिरात नियोजन करण्यात आले असल्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी सांगितले आहे.

◆ आळंदी मंदिरात पहाटे परंपरेने चार वाजता घंटानाद,
सव्वाचारला काकडा, साडेचार वाजता पवमान अभिषेक पूजा, दुधाराती, भाविकांसाठी देवदर्शन, श्रीना नैवेद्य, धुपारती, रात्री श्रीची शेजारती असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. भाविकांचे साठी मंदिर रात्री आठ ते सकाळी सहा यावेळेत बंद राहणार आहे. भाविक, नागरिकांनी मंदिर व्यवस्थापनस सहकार्य करावे, असे आवाहन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले आहे.
———

◆ अलंकापुरीतून मंदिरे देवदर्शनास खुली करण्याचे निर्णयाचे स्वागत
◆ अलंकापुरीत मंदीर दर्शनास खुले भाविकांचा आळंदीत आनंदोत्सव

संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले, त्यानिमित्त आळंदी शहर भाजपाच्या वतीने महाद्वार चौकात भाविकांना साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्व मंदिरे, प्रार्थना स्थळे उघडण्यात आली आहेत या निर्णयाचे स्वागत व आनंदोत्सव भारतीय जनता पार्टी आळंदी शहर, आध्यात्मिक समन्वय आघाडी भाजपा, सर्व वारकरी सांप्रदाय भाविक भक्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा समोर पेढे व साखर फुटाणे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य अशोक तिवारी यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर यांना मंदिरात सॅनिटायझर कॅन पुरवण्यात येणार असल्याचे आध्यात्मिक समन्वय आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय घुंडरे, भाजपा आळंदी शहर अध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले. यावेळी भाजपा तर्फे देवस्थानला सुरक्षा साहित्य भेट देण्यात आले.

यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, भाजप आध्यात्मिक विकास आघाडीचे सहसंयोजक संजय घुंडरे, शहराध्यक्ष किरण येळवंडे, गटनेते पांडुरंग वहीले, नगरसेवक सचिन गिलबिले, दिनेश घुले, पंडित महाराज क्षीरसागर, सचिन काळे, बंडू नाना काळे, आनंद वडगांवकर, आकाश जोशी, सदाशिव साखरे, चारूदत प्रसादे, माऊली बनसोडे, सचिन सोळंकर तसेच भाविकांसह देवस्थानचे प्रमुख, वारकरी सांप्रदाय प्रतिनिधी हभप. पंडित महाराज क्षिरसागर, हभप. गजानन महाराज पिंपळे, हभप. बाळासाहेब महाराज शेवाळे, भाविक भक्त, ग्रामस्थ, आळंदी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भजन करीत हरीनामगजरात साखर वाटपकरीत मंदीर देवदर्शनास खुले करण्याचे शासन निर्णयाचे स्वागत करुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आळंदीतील कार्तिकी यात्रेबाबत शासनाने लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!