निधन वार्ता : सौ. लक्ष्मीबाई भिकाजी जाधव
माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव जाधव यांना मातृशोक
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : वाकी खुर्द ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या सौ. लक्ष्मीबाई भिकाजी जाधव ( वय ७३ वर्षे ) यांचे आज रविवार दि. १५ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य, उद्योगपती बाजीरावशेठ जाधव, विद्यमान सरपंच रामदास जाधव व उद्योजक शांताराम जाधव यांच्या त्या मातोश्री होत.