Thursday, April 17, 2025
Latest:
खेडनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाराजकीयविशेष

आळंदी मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारणी जाहीर

 

असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : आगामी आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपला विस्तार जोमाने करण्याचे काम आळंदी शहरात सुरू केले आहे. शहराध्यक्ष अजय तापकीर यांच्यासह मनसेची नवीन कार्यकारीणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांनी जाहीर केली व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.

यावेळी आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, मनोज खराबी, मंगेश सावंत, संदीप पवार, तुषार बवले, सनी दौंडकर, नितीन ताठे आणि मनसे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
आळंदी शहर अध्यक्ष अजय तापकीर यांच्या नेतृत्वाखाली आळंदी शहरातील पुढील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात शहर उपाध्यक्षपदी गणेश गायकवाड, वैभव काळे, शहर संघटकपदी सागर बुर्डे, सचिवपदी कुणाल खोलापूरे, विभाग प्रमुखपदी आधार भामरे आणि मंगेश कुबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आळंदी शहरातील युवा नेते मंगेशभाऊ काळे यांचे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मनसे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या हस्ते मनसेत प्रवेश केला. यावेळी मंगेश काळे यांची आळंदी शहर विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर यांच्यावर मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यासह जुने मनसैनिकांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान आहे. शहर व पालिकेतील विविध विषयांवर आवाज उठवून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!