आदिवासी कुटुंबातील महिलांना दिवाळी फराळ व साड्या वाटप ..
तळेगाव दाभाडे येथील विरांगना महिला विकास संस्थेच्या वतीने राजमाची गावात उपक्रम
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील विरांगना महिला विकास संस्थेच्या वतीने राजमाची येथील आदिवासी कुटूंबातील महिलांना दिवाळी सणाच्या निमित्ताने दिवाळी फराळ आणि साड्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका तथा संस्थेच्या मुख्य प्रवर्तक निलिमा दाभाडे, सदस्या रजनी ठाकूर, शैलजा काळोखे, सविता गावडे, विना दाभाडे, नेहा गराडे, सोनाली शेलार, ज्योती दाभाडे तसेच राजमाची गावच्या सरपंच प्रगती वरे, ग्रामपंचायत सदस्या दीपिका उंबरे यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आहे.
विरांगना महिला विकास संस्था ही महिलांच्या विकासासाठी काम करणारी संस्था आहे. महिलांना वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय उभा करून देण्यासाठी ही संस्था कार्यरत असते. कोरोना लाॅकडाऊनमध्ये आर्थिक कंबरडे मोडलेल्या आणि नंतर झालेल्या निसर्ग चक्री वादळाचा तडाखा सहन केलेल्या राजमाची गावातील आदिवासी महिलांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने विरांगना संस्थेच्या वतीने राजमाची गावात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.