Friday, April 18, 2025
Latest:
पिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कार

मुलगा-मुलगी भेद करणे ही बाब खेदजनक : नगरसेवक विनोद नढे

 

नवजात अर्भकाचे प्राण वाचविल्याबद्दल नितिन सुर्यवंशी व सहकाऱ्यांचा सत्कार

महाबुलेटीन न्यूज : सोमनाथ नढे
पिंपरी : काळेवाडीतील तापकीरमळा चौक येथे बुधवार दि. २८/१०/२०२० रोजी सापडलेल्या नवजात अर्भकाचे प्राण वाचविल्याबद्दल नितिन सुर्यवंशी, प्रशांत नढे, इरफान शेख व गुरुलिंग स्वामी यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत असुन काळेवाडी तील नगरसेवक विनोद जयवंत नढे व काळेवाडी ग्रामस्थांच्यावतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना नगरसेवक नढे म्हणाले की, “नितिन, प्रशांत, स्वामी व इरफान यांनी सामाजिक बांधिलकी जपत एका नवजात अर्भकाचे प्राण वाचविले त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना आजही समाजामध्ये मुलगा / मुलगी हा भेद केला जातो, हि बाब खेदजनक आहे. नवजात बालकाला ( मुलीला ) कच-याच्या ढिगा-यात टाकणे ही खुप वेदनादायक गोष्ट आहे. आजही समाजामध्ये ठिकठिकाणी मुलींविषयी अशी ‘नकोशी’ ची भावना ठेऊन ज्याप्रकारे दुय्यम वागणुक दिली जाते, ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे आणि जी व्यक्ती अशा गोष्टी करतील त्यांना कायद्याने कठोरात कठोर शासन केले पाहिजे तरच अशा घटनांना आळा बसेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!