महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि.२८ ऑक्टोबर २०२० ) खेड तालुक्यामध्ये २३ नवीन कोरोना रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू, चाकणला आढळले सर्वाधिक ८ रुग्ण…
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर, ( दि. २८ ऑक्टोबर २०२० ) : खेड तालुक्यात चोवीस तासात कोरोनाचे २३ नवे रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राजगुरुनगर, चाकण, आणि आळंदी शहरात मिळून १२ तर ग्रामीण भागात ११ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण ९१७३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील ८७९४ बरे झाले असून १८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत १९६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे
यांनी दिली.
तालुक्यात राजगुरुनगर मध्ये २, चाकण ८, आळंदी २, वडगाव घेनंद ३, तर पानमंदवाडी, आंबेठाण, चिंबळी, खराबवाडी,
मेदनकरवाडी, येलवाडी, केळगाव, रासे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
चाकणचा हॉटस्पॉट दर्जा कायम असून चाकण नगरपरिषद हद्दीत आज कोरोनाचे ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने चाकण भाग हा पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरू लागला आहे.