दसऱ्याच्या मुहूर्तावर एल. जी. कंपनी कडून खेड तालुक्याला वस्तूरुपी “सोन्याची भेट”
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : घरगुती वापराच्या वस्तू बनविण्यात अग्रेसर असणाऱ्या एल. जी. कंपनीने खेड तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रम शाळा, मुलींच्या शाळा इत्यादी सर्व ठिकाणी होम अप्लायन्सेस वितरीत करण्याचा निर्धार केला आहे. ज्यामध्ये कंपनीकडून फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, वॉटर कुलर, इत्यादीं आवश्यक वस्तूंचा समावेश असल्याचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा करून हे दान आपल्या पदरी पाडून घेतल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी “दसऱ्याच्या दिवशी देवी पूर्ण अर्थाने पावली आणि माझी झोळी अगदी भरून निघाली ” असे भावनिक उद्गार अनायसे त्यांच्या तोंडून बाहेर पडले.