Thursday, April 17, 2025
Latest:
इतरखेडपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार अतुल बेनके यांनी केले माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे कुटुंबियांचे सांत्वन…

मिलिंद नार्वेकरांनीही सुरेशभाऊंच्या आठवणींना दिला उजाळा

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
चाकण : राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी खेडचे माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोरे कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासोबत खेडचे माजी आमदार रामभाऊ कांडगे, डॉ. अमोल बेनके, राष्ट्रवादीचे खेड तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, राज्य सहकारी बोर्डाचे उपाध्यक्ष हिरामण सातकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, नानासाहेब टाकळकर, शांताराम भोसले, राहुल नायकवाडी, विजय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मिलिंद नार्वेकरांनी ही दिला भाऊंच्या आठवणींना उजाळा : मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याशी दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करताना भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. नार्वेकर म्हणाले की, सुरेशभाऊ निवडणुकीत पराभूत झाले तरी मागील सहा महिन्यात प्रत्येक आठवड्याला ते जनतेची कामे घेऊन मुंबईला येत असे, तेंव्हा मी त्यांना कोरोनाच्या काळात तुम्ही मुंबईला सारखे येऊ नका, असे सांगितले तरीही ते खेड तालुक्यातील जनतेच्या कामासाठी मुंबईला येत होते, असे यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!